Khed : रिक्षातील चार महिला प्रवाशानीच चोरले महिलेचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज – रिक्षामध्ये बसलेल्या चार सहप्रवाशी महिलांनीच महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले आहे. ही घटना खेड (Khed) येथील भान फाटा येथे बुधवारी दुपारी घडली.
Chikhali : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’
याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रिक्षा मधून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत चार इतर महिला प्रवासी देखील रिक्षामध्ये बसल्या होत्या यावेळी भामट्या जवळ येतात आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले यामध्ये फिर्यादी यांचे 12 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात अशी चोरी करणारी टोळी सक्रिय आहे की नाही याचा तपास चाकण पोलीस करत आहेत.