Bhosari : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मयत व्यक्‍तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे 4 सप्टेंबर 2018 रोजी घडली.

अमर सिद्धार्थ गायकवाड (वय 34, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ज्ञानेश्‍वर सिताराम कराळे (वय 50, मु. पो. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील केतन साळुंखे (पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर 2018 रोजी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे वडील मयत असल्याचे माहिती असूनही त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर फिर्यादी अमर गायकवाड, अमर यांची आई रंजना, भाऊ योगेश, बहिण निलम, मयत वडील सिद्धार्थ धर्माजी गायकवाड यांची कुलमुत्यारधारक म्हणून सही केली. त्याआधारे बनावट घोषणापत्रे कुलमुत्यारपत्रे व खरेदी दस्त तयार करून फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.