Bhosari News : गाडी खरेदीसाठी विश्वासाने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक

एमपीसी न्यूज – गाडी खरेदी करण्यासाठी विश्वासाने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून एकाच्या नावावर दुचाकी खरेदी केली. तसेच ती दुचाकी ति-हाईत व्यक्तीला विकून कागदपत्र धारकाची फसवणूक केली. हा प्रकार 6 नोव्हेंबर 2019 ते 31 मार्च 2021 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.

मनोज राजेंद्र बढे (रा. स्पाईन रोड, मोशी), राजकुमार दगडू खेडकर (रा. दाभा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), गणेश सर्जेराव घोलप (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मनोज आणि राजकुमार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत रामदास मछिंद्र हानपुडे (वय 35, रा. चाकण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हानपुडे यांनी तीन वर्षांपूवी गाडी खरेदी करण्यासाठी आरोपी गणेश याच्याकडे त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड यांच्या छायांकित प्रति आणि फोटो अशी कागदपत्रे दिली होती. त्यानंतर आरोपी गणेश याने मनोज बढे आणि हिंदुजा फायनान्स कंपनीत काम करणारा आरोपी राजकुमार याच्यासोबत मिळून फिर्यादी यांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केला.

फिर्यादी यांचे फेडरल बँकेत खाते असल्याचे भासवून खोटे धनादेश देऊन साईबाबा सेल्स प्रा लि. इंद्रायणीनगर, भोसरी या शोरूममधून मोपेड दुचाकी (एम एच 14 / जे सी 3322) खरेदी केली. त्यानंतर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुचाकी ति-हाईत व्यक्तीला विकली. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.