Wakad Crime : कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्याचे अमिष दाखवून एकाची 3 कोटी 45 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्याचे आमिष दाखवून एकाकडून 3 कोटी 45 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर संचालक मंडळावर न घेता तसेच कंपनीचे शेअर नावावर न करता फसवणूक केली. हा प्रकार 12 नोव्हेंबर 2012 पासून 7 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ताथवडे येथे घडला.

कीर्तीकुमार चंपकलाल मणियार (वय 62, रा. मुकुदनगर, पुणे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 7) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टी पी विजयन, त्याची पत्नी लतिका विजयन, अनिल मोहिते (रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी मणियार आणि त्यांचा भाऊ विनोद मणियार यांना विश्वासात घेऊन विपुल प्लास्टिक प्रा. लि. या कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी तीन कोटी 45 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांना संचालक म्हणून न घेता तसेच कंपनीचे शेअर्स नावावर न करता भागीदार करून घेतले नाही.

आरोपी अनिल मोहिते याने फिर्यादी यांच्या मुलाला कंपनीतून दमदाटी करून हाकलून दिले. तसेच घेतलेले पैसे परत न करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना कंपनीत येऊ दिले नाही. अनिल मोहिते याने त्याचा कुठलाही संबंध नसताना कंपनीत ताबा घेऊन फिर्यादी यांच्या मुलाला हाकलून देऊन कंपनीत परत न येण्याची धमकी दिली. तसेच तिन्ही आरोपींनी फिर्यादी यांची तीन कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.