Sangvi : चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2015 पासून ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर आणि नवी सांगवी परिसरात घडली.

सुदर्शन हिरालाल देसले (वय 39, रा. पिंपळे सौदागर) यांनी शुक्रवारी (दि. 28) याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल दिनकर मंदीलकर (रा. ज्ञानसाई विहार, वडमुखवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंदीलकर आणि फिर्यादी देसले यांची ओळख झाली. त्यावेळी मंदीरकर याने आपण सरकारी रुग्णालयांना साहित्य पुरवत असल्याचे सांगत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी देसले यांच्याकडून 31 लाख 62 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर झालेल्या व्यवहारात आरोपी मंदीलकर याने देसले यांना 20 लाख 50 हजार रुपये परत दिले आहेत.

उर्वरित पैशाची मागणी केली असता आरोपीने फिर्यादी देसले यांना खोटे बॅंकेचे गॅरंटीपत्र दाखविले. त्यानंतर पैसे शिल्लक नसलेल्या खात्याचे धनादेश दिले. यामुळे ते धनादेश वटले नाहीत. यामुळे देसले यांनी गुंतवणुकीसाठी दिलेले 11 लाख 12 हजार 500 रुपये आणि परताव्यापोटीचे 10 लाख 82 हजार 550 रुपये परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like