Pune News : सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक,

सैन्य दलाच्या जवानांसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज :  भारतीय सैन्य दलात शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 17 तरुणांची आर्थिंक फसवणूक करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेसह मिलीटरीच्या इंटिलिजन्सच्या संयुक्त विभागाने अटक केली. टोळीमध्ये लष्कारातील एका जवानासह दोघांचा समावेश आहे. वेनिंसग लालिसिंग रावत (वय 45), रवींद्र राठोड (मूळ- दोघेही रा. राजस्थान) आणि लष्करी जवान जयदेवसिंह परिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत मुलांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिलीटरी इंटलिजीन्सला मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी टीम तयार करुन वेनसिंग, रवींद्र आणि हवालदार जयदेवसिंहला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 

पुण्यातील साउथन कमांड येथे लष्कराच्या  लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना गेटवरील हवालदार जयदेवसिंग  हेरत होता. त्यानंतर संबंधित उमेदवारांना माझी आर्मीमधील मोठया अधिका-यांशी ओळख आहे. मी तुम्हाला पास करून देतो असे खोटे आमिष दाखवित त्याने तरुणांची आरोपी वेनसिंग आणि रवींद्रशी ओळख करुन दिली. नोकरीचे काम झाल्यावर मला प्रत्येकी एक ते दोन लाख द्या असे सांगुन त्याने 17 मुलांचे  मूळ कागदपत्र स्वतः च्या ताब्यात घेतले. त्यानंतर मागील 15 दिवसापासून टोळीने मुलांचे लोहगाव याठिकाणी शिक्षक नेमून क्लास घेत फसवणूक केली आहे. अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी  पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.