गुंतवणुकीच्या बहाण्याने दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फॉरेक्स मध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 10 लाख 17 हजार 631 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गहुंजे येथे घडला.

संदीप बाबूभाई पटेल (वय 37, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी रविवारी (दि. 6) शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pimpri news: पिंपरी येथील विशाल मल्टिप्लेक्स थिएटर येथील हर हर महादेव चित्रपट संभाजी ब्रिगेडच्या वतीने बंद पाडण्यात आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांच्याशी आरोपीने टेलिग्राम या अप वरून संपर्क केला. फोरेक्समध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आरोपीने आमिष दाखवले. पटेल यांना वारंवार पैसे पाठवण्यास प्रवृत्त करून आरोपीने 10 लाख 17 हजार 631 रुपये घेतले. त्यानंतर नफा अथवा मूळ रक्कम न देता फसवणूक केली. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.