Chinchwad Crime News : जमिनीच्या व्यवहारात भागीदाराची फसवणूक

एमपीसी न्यूज – दोघांनी घेतलेली जमीन त्यातील एकाने दुस-या भागीदाराला कल्पना न देता परस्पर विकली तसेच दुस-या भागीदाराचे मालमत्ता कार्डवरील नाव कमी केले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 सप्टेंबर 2019 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली 5 चिंचवड येथे घडला.

इलाही इस्माईल शेख (वय 37, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश पंडित देवरे, महादेव एकनाथ कदम (दोघे रा. रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि ऋषिकेश देवरे यांनी खराळवाडी पिंपरी येथील 1417.62 चौरस फूट एवढे क्षेत्र त्रिलोकचंद बनारसीदास अगरवाल यांच्याकडून खरेदी केले. त्यानंतर ऋषिकेश देवरे आणि महादेव कदम यांनी नंदिनी डेव्हलपर्स या संस्थेच्या नावाने भागीदारीपत्र करून फिर्यादी यांना कल्पना न देता 11 सप्टेंबर 2019 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली 5 चिंचवड येथे दस्त करून विकली तसेच प्रॉपर्टी कार्डवरचे फिर्यादी यांचे नाव कमी करून ऋषिकेश पंडित देवरे आणि महादेव एकनाथ कदम यांनी त्यांची नावे लाऊन घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.