Chakan Crime News : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंत्राटदाराकडे आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, परतावा चांगला मिळेल असे आमिष दाखवून चार लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 21 मार्च 2022 या कालावधीत मेदनकरवाडी चाकण येथे घडला.

सुनील विलास मोहिते (वय 47, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप उत्तरेश्वर पवार (रा. चाकण. मूळ रा. बार्शी नाका, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi Crime News : फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा; तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तो रोडवेज सोल्युशन इंडिया कंपनी कोंढवा या रस्ते बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणा-या कंपनीत कामाला असल्याचे फिर्यादीला सांगितले. रस्ते बनविणा-या मशिनरीच्या कुलंट वैगेरे मेंटेनन्स बघण्याचे काम आम्ही दुस-या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असते. ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या ओळखीचे असून त्यांना आर्थिक मदत केल्यास ते आपल्याला चांगला परतावा देतील, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून गुंतवणूक म्हणून चार लाख 30 हजार रुपये घेऊन त्याचा अपहार व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.