Wakad News : प्लॉट खरेदीत चार लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज प्लॉट खरेदीसाठी लाख रुपये घेऊनही प्लॉटचा ताबा न दिल्या प्रकरणी एकावर वाकड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Wakad News) हा प्रकार वाकड येथे  8 फेब्रुवारी 2021 ते आज अखेर या कालावधीत घडला.

याप्रकरणी चेतन प्रभाकर बिडकर (वय 30 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रदीप नातू राठोड (वय 34 रा. वारजे) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Nigdi News : गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्यावतीने  प्रजासत्ताक दिन साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने 2021 साली दारुंब्रे मावळ येथील प्लॉट क्रं 35 येथील 1 गुंठा जमीन विकली, त्यासाठी 4 लाख 20 हजार 1 रुपया अशी (Wakad News) रक्कम घेतली. मात्र मध्यंतरी त्याने तोच प्लॉट दुसऱ्याला विकला व अजूनही फिर्यादी यांना जमिनीचा ताबा न देता त्यांची फसवणूक केली.

फिर्यादीत म्हटल्यानुसार आरोपीने आणखी आठ ते नऊ जणांची अशीच फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.