Chinchwad : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवत एकाच्या खात्यातून 1 लाख  45 हजार रुपये काढून घेतले. (Chinchwad) यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 22 मार्च रोजी चिंचवड येथे घडली आहे.

 

हरिष शंकर मोळावडे (वय 28 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून 9771141581 व 7294044772 या क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज फायनान्सचे बोरीवली य़ेथील ऑफीस मधून बोलत असल्याचे सांगत विश्वास संपादन करून एक लिंक पाठवली ती लिंक ओपन करताच (Chinchwad) 5 वेगवेगळे व्यवहार करत 1 लाख 45 हजार रुपये खात्यातून काढून घेत फसवणूक केली. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.