Pune News : नागपूर हायवेचे काम मिळत आहे असे सांगून 1 कोटी 15 लाखांची फसवणूक

Fraud of Rs 1 crore 15 lakh for claiming to be getting Nagpur Highway work

एमपीसी न्यूज – नागपूर हायवे (NH-47) या रस्त्याचे काम मिळत असून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून, एक कोटी रूपयांसाठी 31.2 टक्के मोबदला देण्याचे अमिष दाखवून 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. जून 2017 ते 31 जुलै 2021 याकाळात फॉरच्युन इस्टेट, आकाशवाणी, हडपसर येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी हडपसर येथील 31 वर्षीय इसमाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने नागपूर हायवे (NH-47) या रस्त्याचे काम मिळत आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. त्यासाठी एक कोटी रूपयांसाठी 31.2 टक्के मोबदला देण्याचे अमिष त्यांनी फिर्यादीला दाखवले. तसेच, साईटवर अपघात झाल्याचे सांगून पुन्हा फिर्यादीकडून पंधरा लाख रूपये घेतले. असा एकूण 1 लाखा 15 हजार रूपयांची फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.