Pune News : बीएमडब्ल्यू कार स्वस्तात देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

0

एमपीसी न्यूज : सुस्थितीत असणारी बीएमडब्ल्यू कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हडपसर येथे हा प्रकार घडला आहे. 

याप्रकरणी तुषार लक्ष्मणराव लोखंडे (वय 33) यांनी फिर्याद दिली असून हडपसर पोलिसांनी अमर सूर्यकांत पोळ ( ब्रिक क्रिस्टल  सोसायटी, भोसले नगर हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 10 ऑक्टोबर 2020 पासून आतापर्यंत वेळोवेळी घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बीएमडब्ल्यू कंपनीची जुनी X5 ही कार स्वस्तात घेऊन देण्याचे आमिष फिर्यादी तुषार लोखंडे यांना दाखवले. त्या बदल्यात त्यांच्याकडून कार खरेदी करण्यासाठी वेळोवेळी दहा लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते.

त्यानंतर कारण न देता त्यांची फसवणूक केली. दरम्यान फिर्यादीने पैसे परत मागितले असता वेळोवेळी मागूनही ते परत दिले नाहीत. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment