Wakad News : भिशीच्या नावाखाली 12 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – भिशी चालवून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी मिळून एका ज्येष्ठ नागरिकाची बारा लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2013 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत थेरगाव येथे घडला.

लक्ष्मण नथु रानवडे (वय 66, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल, संदीप पवार, अरुण गायकवाड, हरी गायकवाड आणि दोन महिला (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून भिशी चालवली. तसेच फिर्यादी यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी वेळोवेळी पैसे घेतले. सन 2013 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांची बारा लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.