Wakad News : दुप्पट नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे अमिश दाखवून तिघांनी मिळून एका व्यक्तीकडून 13 लाख रुपये घेतले. मुदत संपल्यानंतर गुंतवणूक करणारी व्यक्ती पैसे मागण्यासाठी गेली असता त्या व्यक्तीला पैसे न देता फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते 27 मार्च 2021 या कालावधीत वाकड, बालाजीनगर येथे घडला.

सचिन खंडेराव गायकवाड, अश्विनी उर्फ बाई सचिन गायकवाड, खंडेराव यादवराव गायकवाड (सर्व रा. सिंहगड रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत जोतिबा मारुती रोकडे (वय 38, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना गुंतवणुकीवर एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी आरोपींनी फिर्यादीकडून 13 लाख रुपये घेतले. ठरलेल्या मुदतीनंतर फिर्यादी हे आरोपींकडे पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना गुंतवलेले पैसे आणि आश्वासित मोबदला यापैकी काहीही न देता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.