Pune Crime News : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिषाने 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेत पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल साडे सतरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. शुभांगी भिकाराम पोटे (वय 36) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी संतोष शांतीलाल वालेकर याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑक्टोबर 2019 पासून वारंवार हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना आणि त्यांच्या भावजींना आणि त्यांच्या आणखी काही ओळखीच्या लोकांना पुणे महानगरपालिकेत क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल 17 लाख 50 हजार रुपये अधिक पैसे घेतले. ऑक्टोबर 2019 पासून हा सर्व प्रकार सुरू होता. इतके पैसे घेतल्यानंतरही आरोपीने फिर्यादीस नोकरी लावली आहे.

Pune News : पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कार्यशाळा संपन्न

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने आरोपीकडे पैसे परत देण्याची मागणी केली, तर आरोपीने पैसेही परत दिले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने येरवडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.