Sangvi Crime News : कमी किमतीत फ्लॅट देतो असे सांगत महिलेची 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तुम्ही लगेच पैसे दिले तर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅट देतो, असे सांगून दोघांनी एका महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. महिलेला फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली तसेच आरोपींनी दिलेला सिक्युरिटी डिपॉझिटचा चेक बाउंस झाला. हा प्रकार 22 ऑक्टोबर 2020 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सांगवी येथे घडला.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल जयप्रकाश गायकवाड आणि एक महिला (दोघे रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी त्यांचा बांधकाम व्यवसाय असल्याचे सांगितले. ‘पिंपळे गुरव मधील मोरया गल्ली नंबर सहा येथे साई लक्ष्मी आणि लक्ष्मी नारायण या दोन स्कीम चालू आहेत. तुम्ही लगेच पैसे दिले तर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅट देते असे सांगून फिर्यादीकडून 22 ऑक्टोबर 2020 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत रोख आणि चेकद्वारे 20 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना फ्लॅट दिला नाही तसेच आरोपींनी फिर्यादी यांना दिलेला सिक्युरिटी डिपॉझिटचा चेक बाउंस झाला. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना यापूर्वी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.