Pune News : भाडेतत्त्वावर लॅपटॉप घेऊन 21 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : आयटी कंपनीसाठी लागणारे लॅपटॉप आणि इतर साहित्य भाडेतत्त्वावर घेऊन एका व्यक्तीची तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महेश त्रिंबक पातुरकर (वय 52) त्यांनी तक्रार दिली असून संदेश रणावरे याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आयटी कंपनी साठी लागणारे साहित्य आणि इतर वस्तू भाडेतत्त्वावर देण्याचा फिर्यादीचा व्यवसाय आहे. आरोपीने मागणी केल्यानुसार ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या काळात फिर्यादीने त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे 44 लॅपटॉप भाडेतत्त्वावर दिले होते. यासाठी पाच लाख बावीस हजार रुपये भाडे ठरले होते. मात्र आरोपीने भाडे न देता लॅपटॉपही परत केले नाहीत.

फिर्यादीने पैसे देण्याचा तगादा लावल्याने आरोपीने त्यांना दोन चेक दिले. परंतु हे दोन्ही चेक बँकेत वाटले नाहीत. त्यानंतर फिर्यादीना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.