Pune News : शिपिंगच्या व्यवसायात प्रॉफिट मिळवून देण्याच्या आमिषाने 35 लाखाची फसवणूक

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शिपिंग च्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास प्रॉफिट मिळवून देतो असे सांगून एकाची तब्बल 35 लाख 41 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्याच्या घोरपडी परिसरात हा प्रकार घडला असून वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

मितू मित्तल (वय 43, विमल अपार्टमेंट उदय बाग घोरपडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून पार्वती चड्डा, राजीव चड्डा आणि दृष्ट्या राजीव चड्डा त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मे 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपींनी फिर्यादीला शिपिंग चा व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक करा आम्ही तुम्हाला प्रॉफिट देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 47 लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा शीपिंगचा व्यवसाय न करता ते पैसे वेगळ्याच कामासाठी वापरले.

त्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता 11 लाख 67 हजार रुपये परत दिले. उर्वरित 35 लाख 41 हजार रुपये परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. तसेच आरोपीने फिर्यादी कडून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शिपिंग च्या व्यवसायाचे एग्रीमेंट करतो असे सांगून त्यावर चुकीचा मजकूर लिहून वेगळाच दस्तऐवज तयार केला.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली म्हणून वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.