Talegaon News : मिनिस्ट्री कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने 39 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका टोळीने मिनिस्ट्री कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने फी म्हणून 38 लाख 90 हजार रुपये घेतले. खाजगी क्लासेस मध्ये 45 दिवसांचे ट्रेनिंग देऊन बनावट जोईनिंग लेटर देखील दिले. याप्रकरणी तेरा जणांहून अधिक जणांच्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल ढोलपुरीया, मनीष ढोलपुरिया, संगीता ढोलपुरीया, (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), ब्रह्मकुमार ढोलपुरीया, संतोषकुमार पंडित, रवी, मोहित, दीपकसिंग, रोहित गडलिंगकर, विशाल ट्रॅव्हल्सचे मालक, ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूटचे शिक्षक, महिला आणि इतर जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयूर दिलीप कसबे (वय 34, रा. त्रिमूर्तीनगर, मळवली, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 1 नोव्हेंबर 2019 ते एक ऑगस्ट 2021 या कालावधीत यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे घडला. आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी आणि इतर उमेदवारांना मिनिस्ट्री कोट्यातील रेल्वे टीसी व इतर पदासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मिनिस्ट्री कोट्यातील फी म्हणून सर्वांकडून 38 लाख 90 हजार रुपये आरोपींनी घेतले. त्यानंतर फिर्यादी व इतर उमेदवारांना खाजगी क्लासेस मध्ये 45 दिवसांचे ट्रेनिंग दिले. त्यानंतर फिर्यादी यांना खोटी व बनावट जॉइनिंग लेटर देऊन त्यांना कोणतीही नोकरी न देता फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.