Hinjawadi Crime News : नोकरीचे आमिष दाखवून 4.75 लाखांची फसवणूक, एकास अटक 

एमपीसी न्यूज – नोकरीचे आमिष दाखवून 4.75 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी मध्ये उघडकीस आला आहे. जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक केली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

अमोल आत्माराम भोईर (वय 24, रा. डांगे चौक, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, अमोल शहाजी पाटील ( रा. डांगे चौक, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महेश सौदागर राऊत (वय 22, रा. नेरे, मुळशी, पुणे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महेश याला नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून 4 लाख 75 हजार रुपये स्वतःच्या बॅंक खात्यात जमा करून घेतले. त्याबदल्यात फिर्यादीला मंत्रालयाची बनावट कागदपत्रे तयार करून दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव यलमार अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.