Sangavi Crime News : लंडनमध्ये नोकरीला लावतो असे आमिष दाखवून साडे चार लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – लंडनच्या रॉयल ब्रॉमटन हॉस्पिटलमध्ये नोकरी लावतो असे सांगून दोघांची साडे चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान जुनी सांगवी येथे हा प्रकार घडला. 

याप्रकरणी अर्चना विपुल खंडागळे (वय 31, रा. जुनी सांगवी) यांनी शुक्रवारी (दि.26) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंक्स रेड्डी उर्फ झोया बाबु हिच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लंडनच्या रॉयल ब्रॉमटन हॉस्पिटलमध्ये नोकरी लावतो असे आमिष दिले. व 20 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपये घेतले. तसेच, फिर्यादी यांचा भाडेकरु याला देखील लंडनमध्ये ड्रायव्हरची नोकरी लावतो असे सांगून रोख रक्कम एक लाख रुपये घेतली. असे दोघांची एकूण 4 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.