Pune News : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 40 लाखांची फसवणूक

एकाला अटक

एमपीसी न्यूज : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास वर्षाला 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली.

समीर शौकत इनामदार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरण स्वारगेट पोलिसांनी गौरीहर भागवत, रश्मी शेख आणि गणेश बडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रितेश चंद्रकांत बाबेल (वय 42) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की बाबेल आणि इनामदार हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. इनामदार हे ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने बनवून घेऊन विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी बाबेल यांना या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले.

त्यानुसार बाबेल यांनी वेळोवेळी 40 लाख रुपये इनामदार यांच्याकडे दिले होते. दरम्यान फिर्यादी बाबेल यांची मर्सिडीज कार विकायची असल्याचे इनामदार व गौरीहर यांना समजल्यवर त्यांनी गाडी व कागदपत्रे घेतली मात्र पैसे दिले नाही. फिर्यादीना खटाव येथील जमीन व वारजे येथील फ्लॅट देण्याचे कबूल केले. फिर्यादीने फ्लॅट ची कागदपत्रे पाहिले तेव्हा ती बनावट असल्याचे समजले. त्यानंतर चौघांविरुद्ध फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.