Wakad Crime News : जास्त परताव्याचे आमिष दाखवून एकाची 43 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आमच्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची 43 लाख 57 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 23 जानेवारी 2021 ते 24 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडला.

विक्रांत विजय भोसले (वय 38, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रायन पोप (रा. हांडेवाडी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी सोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादी यांना त्याच्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास तो इतर गुंतवणूकदारांपेक्षा जास्त परतावा देतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. 18 मे 2021 ते 24 फेब्रुवारी 2022 या कालावधीत त्याने फिर्यादीकडून 69 लाख 30 हजार 500 रुपये घेतले.

फिर्यादी यांचा आणखी विश्वास संपादन करून त्यांच्याकडून आणखी रक्कम मागण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांना 25 लाख 72 हजार 503 रुपये इतकी रक्कम परत केली. मात्र उर्वरित 43 लाख 57 हजार 997 रुपये परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.