Sangvi : ऑनलाइन तिकीट बुकिंग जॉब असल्याचे सांगत महिलेचे पावणे पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- ऑनलाईन तिकीट बुक करण्याचा पार्ट टाइम जॉब असल्याचे महिलेला आमिष दाखवण्यात आले. यामध्ये महिलेची तब्बल 4 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत नवी सांगवी (Sangvi) येथे घडली.
Chikhali : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’
याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि.27) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी यशिका शर्मा व स्काय स्कॅनर कंपनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला संपर्क साधून ऑनलाईन तिकीट बुक करण्याचा पार्ट टाइम जॉब असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर टेलिग्राम वर https://www.skyscanerworldwide.com/ ही लिंक पाठवून अकाउंट ओपन करण्यास सांगितले.
याबरोबर फिर्यादीची सर्व माहिती त्यात भरून घेऊन जास्तीत जास्त कमिशन देण्याचा बहाणा करत फिर्यादी यांच्याकडून चार वेळा कमिशन भरून घेतले व कोणताही परतावा न देता अकाउंट मायनस मध्ये असल्याचे सांगत फिर्यादी यांची 4 लाख 79 हजार 452 रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.