Pune News : पारले बिस्कीटच्या ऑडिशन निवडीसाठी 5 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पारले बिस्कीट कंपनीच्या जाहिरातीसाठी मुलाची निवड करण्याच्या बहाण्याने एकाला सायबर चोरट्याने  4 लाख 72 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना जुलै ते ऑगस्ट दरम्यान घडली. याप्रकरणी विवेक रजपूतभाट यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवेक एका खासगी कंपनीत कामाला असून त्यांच्या मुलाला जाहिरातीमध्ये काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली होती. त्यानिमित्ताने साबयर चोरट्याने विवेक यांना फोन करून पारले कंपनीच्या जाहिरातीसाठी तुमच्या मुलाची निवड करण्याची बतावणी केली.

त्यानुसार विवेकने त्याच्यावर विश्वास ठेवला. विविध कारणे सांगून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून 4 लाख 72 हजार रूपये ऑनलाईनरित्या घेतले. मात्र, जाहिरातीसाठी मुलाची निवड न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.