Nigdi News : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 80 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दोघांनी मिळून सहा जणांची एकूण 80 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2017 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडला.

अमोल चिंतामण संखे (रा. नवी मुंबई) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 13) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय हिरेमठ (रा. कोल्हापूर) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंग या भागीदारी व्यवसायाचा चांगला अनुभव असल्याचे सांगून त्यांच्या इपिटोम स्टॉक  फर्म शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविल्यास ज्यादा परतावा दिला जाईल असे आमिष दाखवले. फिर्यादी, त्यांची आई, वडील आणि तीन मित्रांना या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

सहा जणांनी एकूण एक कोटी 42 लाख तीन हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर विनय हिरेमठ आणि त्याच्या पत्नीने फिर्यादी आणि त्यांच्या सहकारी भागीदारांना 61 लाख 75 हजार रुपये परत दिले. उर्वरित 80 लाख 28 हजार रुपये परत न देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.