Bhosari : कर्ज मंजुरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – तीस लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका महिलेची 30 हजार रूपयांची फसवणूक केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच उघडकीस आली.

याप्रकरणी सुशिला प्रभाकर खिरीड (वय-54, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल पाटील  व त्याचा साथीदार समीर आल्हाट (दोघेही रा. शिव क्लासिक बिल्डींग, शिवाजीवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुशिला खिरीड यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. आरोपींनी 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. कर्ज मंजुरीसाठी 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून महिलेकडून नाशिक फाटा येथील एका हॉटेलमध्ये 30 हजार रुपये घेऊन कर्ज मंजूर न करता फसवणूक केली. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.