Chinchwad News : वीजबिल थकले आहे सांगत दोन लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एमएसईबी मधून बोलत आहे, तुमचे वीजबिल थकले आहे, असे सांगत एका व्यक्तीकडून 1 लाख 94 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. (Chinchwad News) ही घटना 2 ते 7ऑगस्ट 2022 या कालावधीत शाहूनगर चिंचवड येथे घडली.

नारायण जगमोहन महाराणा (वय 35, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास भिमहतो मंडल (वय 28, रा. कापका, बरकट्टा, जि. हजारीबाग, झारखंड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्यामुळे मिळाला आधार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींना फोन करून तो एमएसईबी मधून बोलत असून फिर्यादीचे वीजबिल थकले आहे. ते न भरल्यास वीज कनेक्शन कट करण्यात येईल, (Chinchwad News) अशी भीती दाखवून फिर्यादींच्या बँक खात्याची माहिती घेत त्यांच्या खात्यावरून एक लाख 94 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.