Pune : पार्टनरशिपचे आमिष दाखवून 48 लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज – पार्टनरशिपचे आमिष दाखवून 48 लाखांची फसवणूक केल्याची घटना मे 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत वानवडी येथील विक्रांत मोटर्स (महात्मा फुले सांस्कृतिक भवन) येथे घडली

याप्रकरणी संभाजी जरांडे (वय 43, रा.तरवडे वस्ती, महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी संभाजी जरांडे यांना विक्रांत मोटर्स मध्ये पार्टनरशिप देऊन फर्म मध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 48 लाख घेतले. परंतु फिर्यादी संभाजी यांना कोणतेही पैसे देण्यात आलेले नाही.

याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.