Chakan News : भाड्याने टेम्पो लावण्याचे अमिश दाखवून नेलेला टेम्पो परत न देता फसवणूक

एमपीसी न्यूज – भाड्याने टेम्पो लावतो असे सांगून एकाने नवीन टेम्पो घेण्यास सांगितले. त्यानुसार टेम्पो घेतल्यानंतर एकाने टेम्पो नेला तो मालकाला परत दिलाच नाही. याबाबत टेम्पो घेऊन जाणा-याच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 मार्च 2020 ते 16 जानेवारी 2021 या कालावधीत खेड तालुक्यातील निघोजे डोंगरवस्ती येथे घडला.

अमोल उर्फ बंडू आप्पासाहेब औटे (वय 40, रा. महाडीवाडी, ता. पेन, जि. रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीकांत शिवाजी औटे (वय 32, रा. नांदा, रुईनालकोड, ता. आष्टी, जि. बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना नवीन टेम्पो (एम एच 14 / एच क्यू 5406) घ्यायला लावला. टेम्पो भाड्याने लावून त्याचे प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये देण्याचे अमिश दाखवून अमोल याने फिर्यादी यांचा टेम्पो नेला. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांचा टेम्पो, टेम्पोचे भाडे काहीही देण्यास आरोपीने टाळाटाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.