Wakad : खात्यातून परस्पर रकम काढल्याप्रकरणी अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – खातेदाराच्या खात्यातून त्यांच्या परस्पर 1 लाख 18 हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शामदेव बदन विश्वकर्मा (वय 40, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी 2019 रोजी दुपारी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी शामदेव यांनी त्यांच्या बँक खात्याचा कोणताही ओटीपी किंवा अन्य गोपनीय माहिती कुणाशीही शेअर केली नाही. तरी देखील अज्ञातांनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यामधून 1 लाख 18 हजार रुपये परस्पर काढून घेतले. याबाबत अज्ञातांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.