Talegaon : बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करणा-या विद्यार्थ्यावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – बनावट जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी सादर केले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक जानेवारी रोजी डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आंबी येथे उघडकीस आली.

प्राचार्य अभय आनंदराव पवार (वय 47, रा. वाघोली) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साहिल अनिल पेडणेकर (वय 20, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याने आंबी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयात प्रवेश घेताना आर्थिक आणि शैक्षणिक फायदा घेण्यासाठी हिंदू भंडारी या जातीचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयाकडे सादर केले. हे प्रमाणपत्र सादर करून त्याने संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.