Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथे मोफत कोरोना प्राथमिक तपासणी शिबीर

Free Corona Preliminary Inspection Camp at Talegaon Dabhade आमदार सुनील शेळके आणि कृष्णा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.4) ते शनिवार (दि.8) या दरम्यान तळेगाव दाभाडे येथे मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत कोरोना प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

आमदार सुनील शेळके आणि कृष्णा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिराची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे.

मंगळवार (दि.4) ते गुरुवार (दि. 6) या दरम्यान नगरपरिषदेच्या तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा तर शुक्रवार (दि. 7) ते शनिवार (दि. 8) या दरम्यान तळेगाव स्टेशन येथील नगरपरिषदेच्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 7 येथे हे शिबीर होत आहे.

नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.