Talegaon Dabhade : गोडुंब्रे येथील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

दिवंगत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि सुनील शेळके फाऊंडेशनचा उपक्रम

एमपीसी न्यूज- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिवंगत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि सुनील शेळके फाऊंडेशनच्या वतीने गोडुंब्रे येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

या वेळी सरपंच सागर सावंत, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी किशोर सावंत, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, किशोर सावंत, चेतन सावंत, रुपेश सावंत तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

या सायकलींमुळे संबंधित विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट वाचणार असून अभ्यासासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आल्हाट सर यांनी पत्र लिहून सुनील शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.