Chikhli : कुदळवाडीत महिलांना गॅस सिलिंडर व शेगडीचे मोफत वाटप 

एमपीसी न्यूज –  कुदळवाडी येथील शहीद शंकर गॅस एजन्सी आणि फ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरीब व गरजू महिलांना आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते मोफत गॅस सिलेंडर व शेगडीचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाचे महापौर राहुल जाधव व त्यांच्या पत्नी मंगल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. आमदार लांडगे यांनी सरकारच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवा आणि गरीबांना योजनांचा लाभ मिळवून द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या कार्यक्रमात १०० गोरगरीब महिलांना मोफत गॅस आणि शेगडीचे वाटप करण्यात आले. यावेळी अभिनेत्री प्राची पालवे, शहीद शंकर गॅस एजन्सीचे दीपक डोके, सुरेश डोळस, प्रशांत रोकडे, मंगल जाधव, नगरसेविका करूणा चिचंवडे, साधना मळेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुदंन गायकवाड, संतोष मोरे, सांगर हिगंणे, पांडुरंग भालेकर, गोपीकृष्ण धावडे, संतोष जाधव, रामभाऊ कोहीनकर, काळुराम यादव, दत्तात्रय मोरे, गुलाब बालघरे, ज्ञानेश्वर मोरे, किसन बालघरे, आंनदा यादव, पांडुरंग बालघरे, उत्तम यादव, किसन हरगुडे, मुरलीधर ठाकूर, युवराज पवार, किसन यादव, विजयराज यादव, सोपान ढमाले, उत्तम बालघरे, पप्पू लांडगे, गणेश यादव, नवनाथ मुऱ्हे, किसन बावकर, कोंडीबा यादव, दत्तात्रय बालघरे, अशोक यादव, बाळासाहेब पवार, रामकृष्ण लांडगे, फिरोज शेख, चांगदेव बालघरे, अर्जुन लांडगे, केरूभाऊ बालघरे, शैलेश मोरे, लालचंद यादव आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. प्रदीप कदम यांनी जीवन जगण्याचा मूलमंत्र सांगितला व सामाजिक एकोपा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय तरटे यांनी केले. काका शेळके यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.