Chinchwad News : नेत्र तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी, 65 जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज : श्री अग्रसेन ट्रस्ट हॉस्पिटल चिंचवड- प्राधिकरण व लखमीचंद आर्य सोवेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (Chinchwad News) केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 250 जणांची तपासणी करण्यात आली. तर यापैकी 65 जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.  

चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे आयोजित या शिबिराचे उदघाटन नेत्र तपासणी साठी आलेले ज्येष्ठ नागरिक वसंत पतंगे आणि सरिता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील रामेश्वर आगरवाल, ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, माजी अध्यक्ष व अग्रवाल समाज फेडरेशन पुणे चे उपाध्यक्ष विनोद बंसल, सेक्रेटरी सतपाल मित्तल, मेडिकल कमिटीचे अध्यक्ष सीए के एल बंसल, विनोद मित्तल ,सुनील ज. आगरवाल,गौरव आगरवाल,विकास गर्ग, धर्मेंद्र आगरवाल, डॉ संतोष आगरवाल, लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक राजपाल आर्य,अरविंद आर्य, आयुर्वेद रुग्णालयाच्या डॉ.चंदना वीरकर,डॉ.मनिषा पिंगळे,डॉ.संदीप दारुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pimple Nilkh News : टाकाऊ वस्तूंपासून उभारलेय “वेस्ट टू वंडर” मॉडेल

अध्यक्ष आर्य म्हणाले कि,लखमीचंद आर्य फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही रुपीनगर आणि ट्रांसपोर्ट नगर या दोन ठिकाणी गेल्या 10 वर्षांपासून गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देत आहोत.

यावेळी अध्यक्ष सुनील रा. आगरवाल म्हणाले कि, इमारत उभी करणे सोपे आहे, मात्र उभारण्यात आलेल्या इमारतीचा सदुपयोग होणे हे महत्त्वाचे आहे. आज आयोजित केलेल्या शिबिरासाठी या इमारतीचा पुरेपूर उपयोग होत आहे. हि महत्वपूर्ण बाब आहे. (Chinchwad News) अग्रसेन ट्रस्टच्या माध्यमातून 15 वर्षांपासून आम्ही मोफत वैद्यकीय सेवा देत आहोत. आणि यासाठी डॉ. संतोष आगरवाल हे मोफत वैद्यकिय सेवा देत आहेत हि कौतुकास्पद बाब आहे.आजच्या कॅम्प चे आयोजन डॉ संतोष आगरवाल, डॉ. रमेश बन्सल, डॉ. सुनील मित्तल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाठक तर आभार के एल बंसल यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.