आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे “मोफत” महाआरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचे आमदार पै.महेश लांडगे यांच्या वाढदिवसा निमीत्त निलेशदादा नेवाळे सोशल फाऊंडेशन च्या वतीने “मोफत” भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या शनिवारी (दि.26) आणि रविवारी (दि.27) आयोजीत करण्यात आले आहे.

हे शिबिर गुंजकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्पाइन रोड चिखली येथे सकाळी दहा ते साडेपाच या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. यामध्ये नागरिकांना हिमोग्लोबीन, रक्तदाब, मधुमेह, हाडांची घनता, सीबीसी,ईसीजी,बीएमआय, लिक्वीड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी होणार आहे.

Talegaon Dabhade : तर डाॅ बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 200 कोटी रुपये मिळवून देऊ – रामदास आठवले

याबरोबरच शिबिरात मुतखडा, कॅन्सर, हर्निया,मुळव्याध,किडनीचे आजार मणक्याचे आजार, शरीरावर असणाऱ्या खुणा, जखमा यांच्याही तपासण्या उपलब्ध असणार आहेत. शिबिरात भाग घेणाऱ्यांना पुढील तीन महिन्यांच्या डॉक्टरांच्या सल्ला व शस्त्रक्रियांसाठी विशेष सवलत देखील दिली जाणार आहे.

धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या शरीराची खरच किती काळजी घेतो हा प्रश्न पडतो?
कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शरीराची काय किंमत असते हे आपल्या सगळ्यांनाच समजले. कोरोनामुळे एक गोष्ट समजली की पैशापेक्षा जास्त आरोग्य महत्त्वाचे आहे. परंतु आर्थिक अडचणींमुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही. म्हणूनच आपल्या परिसरातील नागरिकांसाठी तरीही आपण सर्वांनी या शिबिरात सहभागी व्हावे. स्वतःची व आपल्या कुटुंबाची विनामुल्य आरोग्य तपासणी करावी आणि उपचार करुन घ्यावी, असे आवहान निलेश मधुकर नेवाळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.