Sudumbare : महिला मेळाव्यात महिला संरक्षण प्रतिबंध कायद्याविषयी मोफत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण व जिल्हा परिषद शाळा सुदूंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील महिला व किशोरवयीन मुलींचा गुरुवारी (दि.25) मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या महिला मेळाव्यात महिलांवरील लैंगिक शोषण व महिला संरक्षण प्रतिबंध कायद्याविषयी मोफत मार्गदर्शन व कायदेशीर सल्ला याविषयी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चेतन भागवत यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या कन्या अॅड. दिव्या चव्हाण-जाचक उपस्थित होत्या. तसेच सरपंच संगीता गाडे, उपसरपंच प्रविण गाडे, ग्रामपंचायत सदस्या उमा शेळके, जालिंदर गाडे, बापू दरेकर, भारती आंबोले, मिनीता गाडे, कांता गाडे, आशा गाडे, मोनाली दिवेकर, विद्यार्थींनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका लक्ष्मी घोडेकर यांनी केले होते, सूत्रसंचालन डावखरे सर यांनी केले. ग्रामपंचायत सदस्या उमा शेळके यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.