Pimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात 20 सप्टेंबर पर्यंत मोफत आरोग्य शिबीर 

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी प्रारंभ झालेले हे 20 सप्टेंबर पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 4 वा. पर्यंत सुरू राहील. 

या शिबिरामध्ये संधिवात, आमवात, पक्षाघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे – पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा – सल्ला मार्गदर्शन, बालकांसाठी बालदमा, बाल पक्षाघात, पोटदुखी जताचा, त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार,  मुलांचे वजन न वाढणे – भूक न लागणे,  बिछाना ओला करणे इ.    तसेच स्त्रियांचे विकार,  वंध्यत्व चिकित्सा, प्रसूती पूर्व  तपासणी, प्रसूती त्याचबरोबर त्वचा विकार, सोंदर्योपचार, हृदयरोग, पोटाचे विकार, पित्ताशयातील खडे, मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिसायटिस,  हायड्रोसिल, मुतखडा, शरीरावरील लहान मोठ्या गाठी  तसेच  डोळे, कान, नाक व घसा यांवरील आयुर्वेदीय उपचार – सल्ला मार्गदर्शन, त्याच प्रमाणे आहारविषयक व  योगविषयक मार्गदर्शन केले जाईल.

व्याधींचे योग्य रोग निदान करण्यात येईल. चिकित्सा झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी आंतररुग्ण विभागात मोफत रहाण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.

मोफत आरोग्य शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.येवला यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7796663366 क्रमांकावर संपर्क साधता येईल.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.