Pimpri News : मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज आहे – मंगलाताई कदम

एमपीसी न्यूज : कुशाग्र कदम युथ फाऊंडेशन व स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ संभाजीनगर यांच्या वतीने आज सिद्धिविनायक मंदिर संभाजीनगर येथे संभाजीनगर, शाहूनगर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कुटंबाच्या प्रगतीमध्ये घरातील जेष्ठांचा मोठा सहभाग असतो. कायम घरातील कामे, मुलांच्या व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असताना या धकाधकीच्या जीवनामध्ये ते आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात. यासाठी जेष्ठांच्या आरोग्य तपासणीसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सौ मंगलाताई कदम मा.महापौर यांनी केले.

जेष्ठ नागरिकांची शिबिरामध्ये मोफत ब्लड प्रेशर व ईसीजी तपासणी करण्यात आली. ईसीजी केल्यानंतर टू डी इको तपासणी करण्यासाठी कुशाग्र कदम फाउंडेशन च्या वतीने मोफत कुपण देण्यात आले. नागरिकांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मा.महापौर सौ.मंगलाताई कदम, श्री.कुशाग्र कदम, श्री.गणेश शर्मा, श्री.संदीप पाटील, श्री.योगेश मोरे, श्री.अमर कांबळे, श्री.अब्दुल शिकलकर, श्री.सुरज कारळे व स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.परबती वाडकर, सचिव श्री.दिलीप जाधव, कोषागार श्री.प्रल्हाद गायकवाड, सदस्य श्री.शांताराम पवार, श्री.वैजंतीनाथ स्वामी, श्री.पांडुरंग वाघोली, श्री.रामदास बांगर, श्री.ज्ञानेश्वर बोत्रे यांच्यावतीने करण्यात आले. रुबी एलकेअर तर्फे डॉ.श्री नावीद शेख, डॉ. सौ.विद्या संभलगीळे, डॉ.श्री राकेश गिरमे, श्री प्रकाश धनवट यांच्या वतीने 100 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे हृदय तपासणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.