Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने  संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 320 वारक-यांनी लाभ घेतला. प्रथम उपचार करून औषधांचे वाटप करण्यात आले. 

निगडी, येथे झालेल्या शिबिराचे महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष रो. सदाशिव काळे, सचिव रो. महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी रो. संतोष भालेकर, प्रसिद्धीप्रमुख रो. रविंद्र भावे, वैद्यकीय प्रकल्प अधिकारी रो. गीता जोशी, माजी अध्यक्षा रो. वर्षा पांगारे, रो. बाळकृष्ण  उ-हे, रो. आनंद सुर्यवंशी, रो. जसबिंदर सिंग, रो. कमल जसबिंदर, रो. भाऊसाहेब पांगारे, रो. पंकज अभंग, सुरेखा अभंग, रो. सुवर्णा काळे, रो. उषा उ-हे, रो. शितल अर्जुनवाडकर, रो. अॅनेट प्रेक्षा अर्जुनवाडकर, रो. अनिल नेवाळे आदी उपस्थित होते. 

संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाली. सकाळपासूनच वारकरी शहरात येत होते. सोहळ्यातील सहभागी झालेल्या वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाचे डॉ. बळीराम गाढवे, डॉ. सैफी राणा, डॉ. अक्षय त्यागी यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचा 320 भाविकांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी पिंपरीतील, महेशनगर येथील संजय मेडिकलने औषधांचा पुरवठा केला.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.