Alandi News : बिवरीगाव येथे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्तींनी केली विनामूल्य हेलिकॉप्टरची फेरी

एमपीसी न्यूज – पुण्यातील महालक्ष्मी ऐव्हिएशन व डेव्हलपर्स कंपनी चेअरमन  दत्ताभाऊ  गोते पाटील युवा उद्योजक यांचा एक मानस होता की समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पत्रकार,इ. सामाजिक बांधिलकी जपत  वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या,अध्यात्मिक क्षेत्रामध्ये  काम करणाऱ्या हवेली तालुक्यातील सर्व कीर्तनकार व प्रवचनकरांना सर्व महाराज मंडळींची कंपनीमार्फत विनामूल्य हेलिकॉप्टर राईड करण्यात यावी. त्यानिमित्ताने आज बिवरी गाव येथे  दि.27 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर राईट ठेवण्यात आली होती.

य़ा फेरीचे नियोजन महाराष्ट्र राज्य प्रमुख संत वाड:मय प्रचार-प्रसार समिती अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ह भ प आनंद महाराज तांबे यांनी केले.यावेळी महालक्ष्मी डेव्हलपर्स एव्हीएशनचे बाळासाहेब भोसले पाटील उपस्थित होते.तसेच वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे मान्यवर मंडळी उपस्थित होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.