Pimpri : जागतिक मुळव्याध दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिर व व्याख्यान

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर पिंपरी येथे शल्य तंत्र  विभागामार्फत जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नुकतेच (प्रोक्टोलॉजी) गुदगत व्याधी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. शहाजी चव्हाण शल्य चिकित्सा विभागप्रमुख डॉ. डी.
वाय. पाटील मेडिकल महाविद्यालय पिंपरी व डॉ. महेश संघवी, मुंबई तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात १० दिवस मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड परिसरातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला व पथ्यापथ्य, आहार विहार या
बद्दल रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. लॅझोट्रॉनिक्स या कंपनीतर्फे सुबोध सिंग व अविनाश सोनवणे यांनी लेझर व
व्हिडीओएन्डोस्कोपी नवीन तंत्रज्ञानाने शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून ८५ पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी जागतिक मूळव्याध दिनानिमित्ताने पदवी, पद्युत्तर पदवीचे विद्यार्थी यांना वैद्यकीय नव नवीन तंत्रज्ञान अवलंब करण्याची गोडी लागावी. या दृष्टीकोनातून हे तंत्रज्ञान हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाच्या वापरातून रुग्णांवर योग्य उपचार करता यावेत याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे डॉ. प्रदीपकुमार जोंधळे यांनी सांगितले.

प्रमुख व्याख्याते डॉ. महेश संघवी  यांनी मूळव्याध आणि इतर गुदगत व्याधींवर निदान आणि उपचारांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण विस्तृत माहिती दिली. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्राचे विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. शल्यतंत्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीपकुमार जोंधळे,
डॉ. संजय बाबर, डॉ. प्रियांका पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण मेढेकर तर आभारप्रदर्शन डॉ. अर्चना कुकडे -शिंदे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.