Pimple Saudagar : आरोग्य शिबिरात रिक्षाचालक व साफसफाई कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

उन्नती सोशल फाउंडेशचा उपक्रम

एमपीसी न्यूज – उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने परिसरातील रिक्षाचालकांसाठी व साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५७ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोचन, नस्य, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन यासह विविध आजारांच्या मोफत तपासण्या डॉ. ओंकार बाबेल यांच्या ब्रह्मचैतन्य आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये करण्यात आल्या.

यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे व डॉ. ओंकार बाबेल यांच्या हस्ते आरोग्य शिबिरामध्ये सहभागी रिक्षा चालकांना मोफत औषध देण्यात आले. याप्रसंगी किशोर पुंडे, महेश जाधव, रमेश भिसे,  राजू जाधव, दत्तात्रय साळे यांच्यासह परिसरातील रिक्षाचालक व साफसफाई कामगार, ज्येष्ठ नागरिक व पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उन्नती सोशल फाऊंडेशन संस्थापक संजय भिसे म्हणाले “धावत्या युगात आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर, व्यवस्थित पोहोचण्यासाठी सेवा देणारे रिक्षाचालक व आपल्या आजूबाजूचा कचरा साफ करून आपले आरोग्य सदृढ ठेवण्यास खऱ्या अर्थाने मदत करणारे साफसफाई कर्मचारी यांची प्रकृती सदृढ राहावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्नती सोशल फाऊंडेशन च्या वतीने समाजातील गरजू नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.