BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : माउलींच्या पालखी सोहळ्यात सुकन्या फाऊंडेशनतर्फे मोफत वैद्यकीय सुविधा

एमपीसी न्यूज – निगडी येथील सुकन्या मेडिकल फाऊंडेशन आणि संत विचार प्रबोधिनी दिंडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती सुकन्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण कलमोरगे यांनी दिली.

25 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. 27 जूनपासून फाऊंडेशनच्या वतीने सोहळ्यातील वारकर्‍यांना पंढरपूरला जाताना व परतीच्या प्रवासातही  मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहे. या पालखी सोहळ्यातील वैद्यकीय पथकामध्ये डॉ. परशुराम बलगोड, डॉ. संदीप निंबोरकर, डॉ. किरण कलमोरगे, डॉ. प्रिती नायर, डॉ. अर्चना घाडगे, डॉ. जयश्री कलमोरगे, डॉ. पुष्कर बाविस्कर, विशाल शिंदे, किरण साळुंखे, संदिप सावंत, सुदर्शन मस्के आदी सहभागी होणार आहेत.

ज्या नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी मदत करावयाची असेल. त्यांनी सुकन्या फाऊंडेशन, मिनी मार्केट, यमुनानगर, निगडी येथे संपर्क साधावा, असे आवाहान करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2