Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथे मोफत भाषण कला व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : तळेगाव दाभाडे येथे स्व.सतीशकाका खळदे प्रतिष्ठान मार्फत मोफत भाषण कला व व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेची सुरुवातआज दि.19 रोजी सायंकाळी 4 वाजता पुष्पावती बवले सभागृह येथे होणार असून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना हि कार्यशाळा वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास  वृद्धिंगतहोण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

तळेगाव दाभाडे येथील स्व.सतीशकाका खळदे प्रतिष्ठान द्वारे कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत भाषण केलेचे धडे व स्पर्धेच्या युगात तग धरून टिकून राहण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

नितीन फाकटकर सर व विशाल मोरे सर या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. दि. 20, 21, 22 मे रोजी दररोज संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ मध्ये प्रथमच मोफत भाषण कला शिबिराचे आयोजन केले असल्याने सर्व तरुण तरुणींनी व विद्यार्थ्यांनी ह्या  शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन फाकटकर सरांनी केले आहे.

दरम्यान कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पीडीसीसी बँकेचे संचालक माउली दाभाडे यांच्या हस्ते पार पडणार आहे.तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गणेशतात्या भेगडे,  गणेश खांडगे, रंजनाताई भोसले, यादवेंद्र खळदे यांची असणार आहे.कार्यक्रमाचे नियोजन संकेतभैया खळदे ,अमर खळदे, भूषण खळदे, नितीन फाकटकर सर, विशाल मोरे सर व मुरलीधर मित्र मंडळा मार्फत करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.