TET Webinar : डीएलएड् इंग्लिश टिचर फोरम तर्फे 1 ऑगस्ट पासून मोफत टीईटी मार्गदर्शन वेबिनार

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेचे योग्य व विनामूल्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने, डीएल एड् इंग्लिश टिचर फोरम महाराष्ट्रच्या वतीने 01 ऑगस्ट पासून ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले आहे. आठवड्यातील शनिवार व रविवार या दोन दिवशी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल. 

या ऑनलाईन वेबिनार मार्फत महाराष्ट्रातील तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते मार्गदर्शन वर्गाचे उद्‌घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील डी.एल. एड् विद्यार्थ्यांनी व टीईटी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी या मोफत मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.

* अधिक माहितीसाठी – 

प्रा. शिवाजी शिंदे – 9823374184,

प्रा.आश्विनी पालवणकर – 9527748527

प्रा.डॉ. रामदास वायभाये – 9325461788

प्रा. राजेश खंडेराव – 7972006256

प्रा.डॉ. राम चट्टे – 9130913111

* वेबिनारसाठी खालील युट्यूब लिंकचा वापर करावा. 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.