Free Vaccination : मोठी बातमी ! राज्यातील सरसकट सर्वांना मोफत लस ; मंत्रीमंडळाचा निर्णय

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्वांच सरकट मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची सध्या महत्वाची बैठक सुरु आहे यामध्ये मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली. राज्यात 18 ते 44 वयोगटात 5 कोटी 71 लाख नागरिक आहेत त्यांना लस मोफत लस मिळणार आहे.  

काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार सर्वांचे मोफत लसीकरण करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा केली नव्हती. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोफत लसीकरणावर शिक्का मोर्तब झाले आहे.
राज्यातील 5.71 कोटी लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य कॅबिनेटने घेतला आहे. यामुळे 6500 कोटींचा भार राज्यावर पडणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.