Free Vaccination : राज्यातील सर्वांना मोफत लस ; मंत्री नवाब मलिक यांची माहिती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

देशात 1 मे पासून अठरा वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. सर्वप्रथम उत्तर प्रदेशने सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर मध्य प्रदेश, बिहार, केरळ आणि छत्तीसगड राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही सर्वांना मोफत लस देणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

लस उत्पादक कंपनी कडून राज्यांना थेट लस खरेदी करता येणार आहे तसेच, बाजारात देखील लस उपलब्ध होणार आहे. देशातील दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचे दर जाहीर केले आहेत. यानुसार सिरमची कोव्हीशिल्ड राज्यांना 400 रुपयांना तर, खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना लस मिळणार आहे. तसेच, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस राज्यांना 600 रुपयांना तर, खासगी रुग्णालयांना 1,200 रुपयांना लस मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.